
Ajit Pawar Muslim MLA : ‘‘आतापर्यंत एकदाही मी गोवंश हत्येचे समर्थन केले नाही आणि करणारही नाही. बेकायदेशीरपणे होत असलेल्या प्रत्येक गोष्टीला माझा विरोधच असेल. तरीही मी शेतकऱ्यांची बाजू मांडली म्हणून जातीयवादी समजून माझ्यावर आरोप केले जात आहेत. अल्पसंख्याक आमदार असल्यानेच काहीजणांकडून माझ्यावर टीका केली जात आहे,’’ असे आरोप आमदार इद्रिस नायकवडी यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत केले.