esakal | आजरा: आजऱ्यात बांबूच्या कोमच्याची शेती
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा: आजऱ्यात बांबूच्या कोमच्याची शेती

आजरा: आजऱ्यात बांबूच्या कोमच्याची शेती

sakal_logo
By
रणजित कालेकर

आजरा: बांबूच्या कोमच्याची आजरा तालुक्यात व्यावसाईक पध्दतीने लागवड करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी सुमारे २० एकर क्षेत्रावर ही शेती केली जात असून हे कोमचे हॉटेल व अन्य उत्पादनसाठी पुरवठा केला जाणार आहे. शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे. या व्यवसायासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधनही केले जात आहे.

हेही वाचा: कोल्हापुरात राजघराण्याच्या गणेशाचे शाही लवाजम्यासह आगमन

तालुक्यात हिरण्यकेशी बांबू ग्रामविकास शेतकरी गट बांबूच्या व्यावयासाईक लागवड आणि प्रक्रिया उद्योग निर्मितीसाठी कार्यरत आहे. या गटातर्फे बांबू नर्सरी सुरु करण्यात आली आहे. या नर्सरीतून माणगा, मानवेल, बांबूसा बल्कोवा, बाबूसा टुल्डा, डॅन्ड्रोकॅल्मस ब्रॅाण्डसी, डॅन्ड्रोकॅल्मस अॅस्पर या जातींची लागवड तालुक्यात केली जात आहे. मुख्यतः बांबू हा कलाकुसर, इमारत बांधकाम, कागद निर्मिती, फर्निचर, शेतीकाम आणि अन्य उत्पादनसाठी वापरला जातो. पण विशेषतः खाद्य उत्पादनात याचा वापर कमी आहे.

चीन, थायलंड, जपान, ब्रम्हदेश, श्रीलंका, अमेरीका, ब्राझील, मेक्सिको, कोलंबिया या देशात खाद्य पदार्थामध्ये बांबूच्या कोमच्यांचा वापर केला जातो. ईशान्येकडील राज्ये, दक्षिण भारतात व कोकणात बांबूच्या कोमच्यापासून विविध पदार्थ केले जातात. यामध्ये प्रामुख्याने कोमंच्याची भाजी, लोणचे, सुप, बांबू करी हे पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ अनेक जण पसंद करीत असून याची मागणी वाढत आहे.

मुंबईच्या दादर मार्कटसह, कोकणातील अनेक बाजारामध्ये बाबंचे कोमचे विकले जातात. एक किलोसाठी चाळीस ते ऐशी रूपये दराने विक्री केली जाते. प्रक्रिया केलेले कोमचे तीनशे ते चारशे रुपये किलो दराने विक्री होते. आजरा तालुक्यात चाळीस वर्षांपुर्वी बाबूंची कोमचे लोक आवडीने खातात. बांबुचे तांदुळ (बिया) ही खाल्ले जात होते. पण हे कालांतराने मागे पडले.

पण आता मात्र याची मागणी जागतिक बाजारपेठेत वाढत चालली आहे. त्यामुळे हिरण्यकेशी बांबू ग्रामविकास शेतकरी गटाने याकडे विशेष लक्ष देवून शेतकऱ्यांचे प्रबोधन व प्रत्यक्ष लागवडीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे यंदापासून बाबूच्या कोमच्या शेती सुरु केली आहे. सुमारे वीस एकर क्षेत्रात याची लागवड झाली आहे.

कोमचे म्हणजे काय?

दरवर्षी पावसाळ्याच्या सुरवातीला बांबू रुजून नवीन कोंब येतात. या कोवळ्या, मासल व मऊ कोंबाना कोमचे असे म्हंटले जाते. हे कोमचे भाजीसह विविध खाद्य पदार्थांसाठी वापरले जातात. यामध्ये औषधी गुणधर्मासह न्युट्रीयन्स, व्हीटॅमीन्स, मिनरल्स, फायबर आणि अॅन्टी ऑक्सीडेंन्ट असतात. तसेच फॅट व कॅलरी अत्यंत कमी प्रमाणात असतात. अनेक पोषक तत्वांनी युक्त असलेल्या बांबूच्या कोंबाना सुपर फुड असेही म्हंटले जाते.

असे वापरले जातात कोमचे

जमिनीतून नुकतेच वर आलेले कोंब सर्वसाधारणतः एक ते दीड फुट वाढल्यानंतर ते कापून आणले जातात. त्याचे आवरण साफ करून त्याचा मऊपणा तपासला जातो. मासल मऊ कोंब हव्या असलेल्या तुकड्यात कापले जातात. हे काप रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी स्वच्छ पाण्याने धूवन घेतले जातात. शिजवून किंवा वाळवून खाद्य पदार्थ बनले जातात.

loading image
go to top