गडहिंग्लज तालुक्‍यातील "हे' सातही तलाव "ओव्हर फ्लो'; उन्हाळ्यातील पाण्याची चिंता मिटली

All The Seven Lakes In Gadhinglaj Taluka Were Filled Kolhapur Marathi News
All The Seven Lakes In Gadhinglaj Taluka Were Filled Kolhapur Marathi News
Updated on

गडहिंग्लज : तालुक्‍यातील सर्व सातही लघुपाटबंधारे तलाव शंभर टक्के भरले आहेत. त्यामुळे या तलावांवर अवलंबून असणाऱ्या गावांतील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा उन्हाळ्यातील प्रश्‍न मिटला आहे. सर्वच तलाव ओव्हर फ्लो झाल्याने पाण्याची चिंता मिटली आहे. तेरणी (122 एमसीएफटी), करंबळी (102), येणेचवंडी (55), वैरागवाडी (53), नरेवाडी (78), शेंद्री (66) व कुमरी (91) या तलावांचा यात समावेश आहे.

प्रत्येक तलावावर एक ते तीन गावांच्या पाणी योजना अवलंबून आहेत. प्रत्येकी 100 ते 200 हेक्‍टरपर्यंतचे क्षेत्र ओलिताखाली येते. त्यामुळे शेतकऱ्यांची उन्हाळ्यातील पाण्याची चिंता मिटली आहे. गतवर्षीही याच महिन्यात हे सर्व तलाव तुडूंब भरले होते. पंधरा दिवसांच्या आधी नरेवाडी तलाव शंभर टक्के भरला आहे. गेल्या आठवड्यातील सलग तीन दिवसांच्या पावसाने वैरागवाडी तलाव भरला होता. उर्वरित सर्व तलाव 80 ते 90 टक्‍क्‍यांच्या आसपास भरले होते. मध्यंतरी तीन-चार दिवस पावसाचे प्रमाण कमी झाले होते. आता दोन दिवसांच्या जोरदार पावसाने सर्व तलाव शंभर टक्के भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. 

विशेष करून पूर्व भागातील तेरणी व नरेवाडी हे महत्त्वाचे दोन तलाव शंभर टक्के भरल्याने तेथील उन्हाळ्यातील पाणी प्रश्‍नावर मात करणे सोपे झाले आहे. याशिवाय गावागावांतील पाझर तलावांमध्ये मुबलक पाणीसाठा झाल्याने आनंद व्यक्त होत आहे. तालुक्‍याला वरदायी ठरणारा चित्री प्रकल्पही चार दिवसांपूर्वीच भरल्याने निम्म्या तालुक्‍याचा पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

1200-year-old Chalukya-era ancient Ganesh idol
Shirol Farmers Water Shortage
Kolhapur Sewage Projects : मुदत संपली तरी, अद्याप काम सुरूच नाही शंभर कोटींच्या सांडपाणी प्रकल्पांना गती मिळेना; प्रशासकीय काळातील मंजुरी
Gokul Election 2026 Latest Update
Marathi News Esakal
www.esakal.com