
Internal Police Politics SP Office : मुख्यालयात सुमारे ७०० ते ८०० पोलिसांचा राबता. व्हीआयपी बंदोबस्त, मोर्चे, आंदोलने, यात्रा, सण-उत्सव, आरोपी पार्टीसह गार्ड ड्यूटीची जबाबदारी. वारंवार घराबाहेर राहणाऱ्या या पोलिसांना हक्काच्या व किरकोळ रजेसाठीही संघर्ष करण्याची वेळ येते. पाच ते सहा दिवसांची रजा मागणाऱ्यांची बोळवण एक-दोन दिवसांवर केली जाते. पण, याठिकाणीही एका साखळीतून ‘कवायती’ करताच रजा मंजूर होते. मुख्यालयात ‘राजा’ची मर्जी सांभाळणाऱ्याला मोठी बक्षिसी दिली जाते.