`अलमट्टी`प्रश्नी लवकरच बैठक ः मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

`Almatti` Issue Meeting Soon: Minister Rajendra Patil-Yadravkar Kolhapur Marathi News
`Almatti` Issue Meeting Soon: Minister Rajendra Patil-Yadravkar Kolhapur Marathi News

जयसिंगपूर : ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या पावसाळा येत आहे. धरणात पाण्याचा साठा मुबलक असल्याने महापुरातील उपाययोजनेसाठी प्रशासन सज्ज राहील. मागील झालेल्या चुका बाजूला ठेवून येणाऱ्या संकटात सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्रित येऊन काम करावे. शिवाय अलमट्टी व हिपरगी धरणातील पाणी सोडण्यासाठी कर्नाटकचे पाटबंधारेमंत्री जारकीहोळी यांच्याशी चर्चा करून कर्नाटक व महाराष्ट्र राज्याची लवकरच बैठक घेणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले. 

जयसिंगपूर येथील नाट्यगृहात महापुराच्या नियोजनासाठी बुधवारी दुपारी शासकीय अधिकारी यांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी अमल मित्तल म्हणाले, ""सध्या कोरोनाच्या संकटकाळातच पावसाळा तोंडावर आला आहे. 2019 मध्ये आलेल्या महापुरात जिल्ह्याची हानी झाली होती. आता त्या चुका होता कामा नयेत. शिरोळ तालुक्‍यातील पूररेषेतील 48 गावांतील नागरिकांना सुरक्षितेसाठी प्रशासन कार्यरत राहील. शिवाय तालुक्‍यात 50 फिरते शौचालय व शाळेत राहण्यासाठी सुविधा व दुरुस्ती तत्काळ करून घेण्यात येतील. ज्या ग्रामपंचातीकडे पुराच्या काळात लागणाऱ्या गोष्टीची पूर्तता नसेल त्यांनी तत्काळ तालुका प्रशासनाकडे माहिती द्यावी.'' 

जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, विजय भोजे, प्रातांधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ आदींनी महापुराबाबत नियोजनाची माहिती दिली. जयसिंगूपरच्या नगराध्यक्षा डॉ. निता माने, कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयराम पाटील, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, मुख्याधिकारी टिना गवळी, अपर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाटगे, डीवायएसपी गणेश बिराजदार आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com