बदनामीचा कोणी प्रयत्न करत असेल, तर जशास तसे उत्तर देणार; अमल महाडिकांचा सतेज पाटलांना इशारा

आमदार सतेज पाटील यांनी राजाराम कारखान्याविरोधात काढलेला मोर्चा हा कारखान्याची बदनामी करण्यासाठीच काढला.
Amal Mahadik vs Satej Patil
Amal Mahadik vs Satej Patilesakal
Updated on
Summary

‘कोल्हापूर दक्षिण विधानसभेची निवडणूक अजून लांब आहे. त्याआधी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजप आणि मित्रपक्ष सज्ज झाले आहेत,’

कोल्हापूर : वेळेवर ऊस तोड दिली जात नसल्याचा आरोप करत आमदार सतेज पाटील यांनी राजाराम कारखान्याविरोधात काढलेला मोर्चा हा कारखान्याची बदनामी करण्यासाठीच काढला असून त्यातून कोणी प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा ‘राजाराम’ चे अध्यक्ष अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी दिली.

दरम्यान, वेळप्रसंगी सत्य परिस्थिती समोर आणण्यासाठी खऱ्या अर्थाने जिथे खासगीकरण झाले आहे, त्या डी. वाय. पाटील कारखान्यावर आपणही मोर्चा काढू, असेही श्री. महाडिक म्हणाले. ‘राजाराम’विरोधात (Rajaram Sugar Factory) आमदार पाटील (Satej Patil) यांनी मोर्चा काढल्यानंतर श्री. महाडिक यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला.

Amal Mahadik vs Satej Patil
'राजाराम'च्या संचालकाला बेदम मारहाण; पाटील-महाडिक वाद पोहोचला मुद्द्यावरून गुद्द्यावर, राजकीय परंपरेला गालबोट

ते म्हणाले, ‘आज पोटनियम बदलाच्या संदर्भात प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्या कार्यालयात सुनावणी होती. या सुनावणीवर अप्रत्यक्षरीत्या दबाव टाकण्यासाठी आजचा मुहूर्त साधून राजकीय भावनेतून प्रेरित असा हा मोर्चा काढण्यात आला. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन, अवकाळी पडलेला पाऊस, मराठा आंदोलन अशा अनेक कारणांमुळे जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांचे तोडणी वेळापत्रक बिघडले आहे. पण केवळ ‘राजाराम’ बद्दल वाटणाऱ्या मत्सरातून हा मोर्चा विरोधकांनी काढला. पण त्याला शेतकरी सभासदांचा थंडा प्रतिसाद मिळाला.’

‘या मोर्चात शेतकरी कमी आणि कार्यकर्तेच जास्त होते. कारखान्याचे एकूण १५ हजार आहेत, यापैकी केवळ १५० लोक मोर्चाला उपस्थित होते. त्यातही २५ भर सभासद वगळता इतर सर्व कार्यकर्तेच सामील होते. मूळ सभासदांचा कारखाना प्रशासनावर पूर्ण विश्वास असल्याचे श्री. महाडिक म्हणाले. उपस्थित असलेल्या २०-२५ सभासदांपैकीही बऱ्याच लोकांचा ऊस कारखान्याने नेला आहे. संदीप नेजदार यांच्या नावासह उदाहरण देत विरोधकांपैकी अशा बऱ्याच लोकांच्या खात्यावर पैसेही जमा झाल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला. यावेळी संचालक दिलीप पाटील, तानाजी पाटील, संतोष पाटील, श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.

Amal Mahadik vs Satej Patil
Hit and Run Law, Truck Drivers Strike : संपामुळं राज्यात 15 लाख ट्रकची चाकं थांबली; तब्बल 500 कोटींचं नुकसान

‘दक्षिण’ चे मैदान लांब

‘कोल्हापूर दक्षिण विधानसभेची निवडणूक अजून लांब आहे. त्याआधी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजप आणि मित्रपक्ष सज्ज झाले आहेत,’ असेही यावेळी महाडिक यांनी नमूद केले. महायुतीतील तीनही पक्ष एकमताने कार्यरत असून येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत याचा प्रत्यय येईल. सतेज पाटील नेतृत्व करत असलेल्या कारखान्यामध्ये काय परिस्थिती आहे हे मी यापूर्वीही सांगितले आहे; पण त्यावर त्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही याकडेही महाडिक यांनी लक्ष वेधले.

Amal Mahadik vs Satej Patil
Satej Patil: सतेज पाटील-महाडिक वाद पुन्हा उफाळला! राजाराम साखर कारखान्याच्या संचालकाला बेदम मारहाण

श्रेय लाटण्याचा प्रयत्न

‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या निधीतून होणारी कामे श्रेय लाटण्यासाठी स्वतःच्या नावावर खपवण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत,’ असा टोलाही महाडिक यांनी लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com