Amba Ghat ST Bus Service: आंबा घाट एसटी वाहतुकीसाठी खुला; जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; तूर्त दिवसाच वाहतूक
Amba Ghat Reopens for ST Bus Traffic: आंबा घाट एसटी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून तूर्त सकाळी ६ ते सायंकाळी ७ या वेळेत पोलिस संरक्षणात वाहतूक सुरू राहणार आहे.
आंबा: आंबा घाटात रस्ता खचल्याने व भेगा पडल्याने बंद पडलेल्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल, आमदार किरण सामंत यांच्यासह अधिकाऱ्यांनी घाटाची आज पाहणी केली.