हा सोहळा देवस्थान समितीच्या (Temple Committee Kolhapur) वेबसाईटसह शहरात ठिकठिकाणी लावलेल्या स्क्रीनवर लाखो भाविकांनी अनुभवला. काल सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी किरणे महाद्वार दरवाज्यातून आत आली.
कोल्हापूर : किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मावळतीच्या सूर्यकिरणांनी अंबाबाईच्या मूर्तीवर सोनसळी अभिषेक केला. स्वच्छ हवेमुळे सूर्यकिरणेही प्रखर होती. मंदिरातील आर्द्रतेचे प्रमाणही ४५ टक्के असल्यामुळे कोणताही अडथळा सूर्यकिरणांना न झाल्यामुळे पूर्ण क्षमतेने अंबाबाईचा किरणोत्सव सोहळा (Ambabai Temple Kiranotsav Sohala) सजला.