ambabai temple kolhapur garud mandap discovery
esakal
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या जतन-संवर्धन आणि विकास कामादरम्यान एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक शोध लागला आहे. मंदिराच्या परिसरात (Ambabai Temple Kolhapur) जमिनीखाली गाडल्या गेलेल्या गरुड मंडपाच्या नक्षीदार चार पायऱ्या समोर आल्या आहेत. यापैकी दोन पायऱ्यांवर आकर्षक नक्षीकाम दिसून येत आहे.