Ambabai Temple Redevelopment: रेडीरेकनर कमी, हवी योग्य मोबदल्याची हमी ; श्री अंबाबाई मंदिर विकास आराखडा; भूसंपादनासाठी विशेष प्रस्ताव मागणी

Landowners Seek Fair Compensation for Acquisition: कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यासाठी भूसंपादन करताना रेडीरेकनर दर आणि प्रत्यक्ष बाजारभावातील मोठ्या तफावतीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Ambabai Temple

Ambabai Temple

esakal

Updated on: 

कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर व परिसर पुनर्विकास आराखड्यांतर्गत भूसंपादन करताना रेडीरेकनरची समस्या आहे. महाद्वार रोड परिसरातील रेडीरेकनरचे दर पाच वर्षांत फारसे वाढले नाहीत. त्यामुळे रेडीरेकनरचे दर आणि जमिनीचे बाजारभाव यामध्ये प्रचंड तफावत आहे. शासनाच्या नियमानुसार रेडीरेकनरच्या अडीचपट रक्कम दिली जाईल. मात्र, रेडीरेकनर न वाढल्याने मिळकतधारकांना योग्य मोबदला मिळणार नाही. त्यामुळे शासनाने या भूसंपादनासाठी विशेष प्रस्ताव बनवावा, अशी मागणी होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com