Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिराच्या गाभारा संवर्धनाची प्रक्रिया पूर्ण; ‘पुरातत्त्व’कडून पाहणी; आजपासून दर्शन सुरू
Devotee Darshan : कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील गाभारा संवर्धनाचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले असून, आजपासून भाविकांसाठी मूळ मूर्तीचे दर्शन पुन्हा सुरू होणार आहे. पुरातत्त्व विभागाने गाभाऱ्याची पाहणी करून कामाची गुणवत्ता तपासली आहे.
कोल्हापूर : गेले चार दिवस सुरू असलेले करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील गाभारा जतन व संवर्धनाचे काम आज पूर्ण झाले. दरम्यान, आज पुरातत्त्व विभागाकडून देवीच्या मूळ मूर्तीची पाहणी करण्यात आली.