अमित शहांच्या फोन नंतर चंद्रकांत पाटील म्हणाले गूड न्यूज; राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण

Amit Shah gave good News to Chandrakant Patil
Amit Shah gave good News to Chandrakant Patil
Updated on

सांगली -  केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांना एक गुड न्यूज दिली आहे. कामेरीच्या (जि. सांगली) दाैऱ्यावर असताना आमदार चंद्रकांत पाटील यांना गृहमंत्री अमित शहा यांचा फोन आला. फोनवरील त्या दोघांमधील संवाद संपताच चंद्रकांत पाटील यांनी गुड न्यूज असे शब्द उच्चारले. परंतु, ही गुड न्यूज नेमकी कोणती ते सांगितले नाही. त्यामुळे ती गुड न्यूज कोणती आहे, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. 

त्याचे झाले असे की, १ डिसेंबर रोजी होणाऱ्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्षातील नेते कामाला लागले आहेत. याच प्रचारासाठी आमदार चंद्रकांत पाटील सांगलीतील ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील यांच्या निवास्थानी आले होते. पाटील यांच्या निवास्थानी इतर नेते आणि पदाधिकारीही उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांचा कार्यकर्त्यांशी संवाद सुरू असतानाच त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली. गृहमंत्री अमित शहा यांचा फोन आहे म्हटल्यावर ते संवाद थांबवून थोडे बाजूला गेले. कार्यकर्त्यांनीही अमित शहा यांचाच फोन असल्याचे ओळखले. दोघांचा फोन सुरू असताना तेथे कुजबूज सुरू झाली. पाटील यांनी शहा यांच्याबरोबरचा संवाद संपवून फोन बंद केला आणि सी. बी. पाटील यांच्याकडे पाहात गुड न्यूज असे म्हटले. फोनवरून अमित शहा यांनी बधाई हो असे म्हटल्याचेही त्यांनी उपस्थितांना सांगितले. परंतु, अमित शहा फोनवर नक्की काय म्हणाले हे सांगितले नाही. त्यामुळे शहा यांनी चंद्रकांत पाटील यांना नक्की कोणती गुड न्यूज हे सांगितले  नाही.

त्या दोघांमध्ये नक्की कोणता सवाद झाला आणि शहा यांनी कोणती गुड न्यूज दिली हे गुलदस्त्यातच राहिले. परंतु, ही गुड न्यूज सर्वांना कळेपर्यंत राजकीय त्रेक्षात मात्र चांगचील चर्चा रंगण्याची शक्यता आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mahabhumi Portal
Forest Department action in Dhangarwadi Kolhapur
Shaumika Mahadik Gokul Milk Union controversy
Krishnaraj Mahadik Rahul Gandhi statement in kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com