शिलालेखाचा काळ सन १२८८ हा असून, तेव्हा या सर्व प्रदेशावर देवगिरीच्या यादवांची सत्ता होती. यादव राजा रामचंद्रदेव त्यावेळी सत्तेवर होते.
म्हाकवे : येथील गावडूबाईच्या देवळात (Gavadubai Temple) तेराव्या शतकातील शिलालेख (Inscription) आढळून आला आहे. हा शिलालेख उत्तर भारतीय वळणाच्या नागरी लिपीत कोरलेला असून त्याची भाषा जुनी मराठी आहे. गुरू रवलदेव यांचा शिष्य रत्नध्वज याने देऊळ बांधल्याचा उल्लेख शिलालेखात केलेला आहे. रत्नध्वजाची आपल्या गुरूवर असलेली श्रद्धाही त्यात प्रकट झाली आहे. शिलालेखाचा शोध हा सोनगे (ता. कागल) येथील शिवकालीन शस्त्र व नाणी अभ्यासक अमरसिंह पाटील यांनी घेतला.