पूर्व पुराश्मयुग : हिरण्यकेशी भागात मिळाली अश्मयुगीन हत्यारे; शिकारीसाठी केला जात होता हत्यारांचा वापर

कृष्णा नदीत मात्र बेसाल्ट या टणक प्रतीच्या खडकाची हत्यारे आढळली आहेत.
Ancient Stone weapons
Ancient Stone weaponsesakal
Summary

शिरोळच्या येडुरवाडीतील हत्यारे साडेतीन लाख वर्षांपूर्वीची असून, अश्मयुगीन हत्यार असल्याचे निश्चित झाल्याने येथे तेव्हापासून मानवी वस्ती होती, हे नक्की सांगता येते.

गारगोटी येथील वेंगळूर गावात वेदगंगा नदी, आजरा तालुक्यातील मडिलगे येथील हिरण्यकेशी नदी (Hiranyakeshi River), गडहिंग्लज परिसरात निगुडगे येथे हिरण्यकेशी नदी, हडलगे येथे घटप्रभा नदी आणि शिरोळ तालुक्यातील शिरगुप्पीजवळ येडूरवाडी येथे कृष्णा नदी अशा सर्व ठिकाणी पूर्व पुराश्मकालीन संस्कृती (Ancient Culture) नांदत असल्याचे पुरावे मिळाले आहेत.

दगडापासून तयार केलेली हात कुऱ्हाड, फरशी, तोड हत्यार (Stone Weapons), तासणी अशी हत्यारे मोठ्या आकाराचा दगडी छिलका, गोटा किंवा गाभ्यापासून तयार केलेली आहेत. इथे आढळलेली हत्यारे प्रमाणबद्ध, सुबक, धारदार कडा असलेली आहेत. कृष्णा नदी वगळता सर्व हत्यारे कलादगीच्या क्वार्टझाईट खडकाची आहेत.

Ancient Stone weapons
मोठी बातमी! 'मंत्री नारायण राणे वाढत्या वयोमानामुळं लोकसभेची निवडणूक लढणार नाहीत'; नीलेश राणे यांची माहिती

कृष्णा नदीत मात्र बेसाल्ट या टणक प्रतीच्या खडकाची हत्यारे आढळली आहेत. विविध कार्योपयोगी असलेली हात कुऱ्हाड ही जमिनीतून कंदमुळे उकरून काढणे, मांस व झाड तोडणे यासाठी केला जात असावा. त्यानंतरच्या मध्यपुराश्ममधील असे पुरावे कोल्हापूर परिसरात हिरण्यकेशी नदी दरम्यान मडिलगे, निगुंडगे, हरळी येथे तर घटप्रभा नदीदरम्यान हडलगे येथे आणि कृष्णा नदीदरम्यान हरिपूर, डिग्रज, वाळवे येथे आढळले.

ही हत्यारे आकाराने लहान असून, त्यामध्ये तासण्या, टोचे, वेधण्या अशी छिलक्यापासून तयार केलेली आकाराने लहान व पातळ हत्यारे आहेत. लाकूड किंवा हाडांपासून तयार केलेल्या या हत्यारांचा उपयोग शिकारीसाठी केला जात असावा. टोकदार टोचा, तिराग्रे किंवा छिद्रे पाडण्यासाठी व तासण्याचा उपयोग बाण तयार करणे, कातडी साफ करण्यासाठी करीत असावेत.

Ancient Stone weapons
Belgaum Crime : विषारी धान्य खायला घालून 11 मोरांची हत्या; वीटभट्टीतील कामगाराला अटक, हत्येत आणखी कोणाचा सहभाग?

मध्याश्मयुग हे एक लाख वीस हजार ते चाळीस हजार वर्षे पूर्वीचे असून, मानवी जीवन हे पुराश्मयुगातील जीवन पद्धतीपेक्षा फारसे वेगळे नसले तरी त्या काळात निवारा, आहाराची पद्धत, शिकारीची तंत्रे, हत्यारांचे विविध प्रकार या बाबींमध्ये तंत्र विकसित झालेले दिसते. त्याचप्रमाणे त्याचा वावर भौगोलिकदृष्ट्या डोंगरमाथा, पठार, डोंगरांचे सौम्य उताराचे प्रदेश, गुहा, नदीकिनारा अशा ठिकाणी आढळला आहे. त्यापैकी कोल्हापूर परिसरात वाळवा, डिग्रज, नृसिंहवाडी, अर्जुनवाड, हरिपूर, पन्हाळा येथील पठारे, विशाळगडचे पठार, गगनगड, गारगोटी येथील गुहेदरम्यान असावा.

या काळात वापरत असलेली लघुअश्म हत्यारे ही आकाराने लहान असली तरी प्रभावी होती. या हत्यारांपैकी अभौमितिक हत्यार संचात विविध प्रकारची पाती, सुसंस्कारित पाती, टोकदार हत्यारे, तासण्या, वेधण्या आढळतात. दुसऱ्या हातात संचात त्रिकोणी, समांतर द्वीभुज चौकोनी, चंद्रकोरीसारखी हत्यारे कोल्हापूर परिसरात सर्व ठिकाणी कमी अधिक संख्येने उघड्यावर आढळली.

Ancient Stone weapons
Loksabha Election : काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री स्वगृही परतणार? भाजपकडून 'या' बड्या नेत्याला ऑफर!

ही हत्यारे लाकडी अथवा हाडाच्या दांडक्यात खाचून बसवलेली, चाकू, विळे, तीराग्रे, मत्स्यबाण, खुरपी अशी असून शिकार, मासेमारी, फळे, कंद, मध, आदी गोळा करण्यासाठी वापरत. त्यानंतरच्या नवाश्मयुगातील पुरावे मात्र कोल्हापुरातच नव्हे, तर महाराष्ट्रातच फारसे आढळलेले नाहीत. शिरोळच्या येडुरवाडीतील हत्यारे साडेतीन लाख वर्षांपूर्वीची असून, अश्मयुगीन हत्यार असल्याचे निश्चित झाल्याने येथे तेव्हापासून मानवी वस्ती होती, हे नक्की सांगता येते. (क्रमशः)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com