esakal | घरगुती गॅस स्फोटात अंगणवाडी सेविका गंभीर जखमी: कबनुरातील घटना; Gas Explosion Incidence
sakal

बोलून बातमी शोधा

घरगुती गॅसची गळती होऊन घरावरील पत्रे उडाले

घरगुती गॅस स्फोटात अंगणवाडी सेविका गंभीर जखमी: कबनुरातील घटना

sakal_logo
By
ऋक्षिकेश राऊत

इचलकरंजी (कोल्हापूर) : कबनुर (Kabnoor) येथे घरगुती गॅसची गळती होऊन त्याचा भडका उडाल्याने अंगणवाडी सेविका गंभीर भाजून जखमी झाल्याची घटना घडली. कांचन स्वामी (Kanchan Swami) असे या महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता.१३) सकाळी कबनुर येथील दत्तनगर गल्ली नंबर 11 मध्ये घडली. जखमी कांचन यांना आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

हेही वाचा: ''राज्यातील पोलिस निवासस्थानासाठी आठशे कोटींची तरतूद''

कांचन स्वामी या भाड्याच्या खोलीत राहतात. सकाळी उठून त्यांनी गॅस पेटवला त्यावेळी अचानक भडका उडाला.या आगीत त्या गंभीर जखमी झाल्या. आगीच्या भडक्य़ात घर उध्वस्त होऊन घराचे पत्रे परिसरात उडाले.आवाज ऐकून भागातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने कांचन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. नंतर त्यांना सांगली सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.

loading image
go to top