esakal | अनिकेत जाधवची एएफसी आशियाई चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात | Kolhapur
sakal

बोलून बातमी शोधा

Football

अनिकेत जाधवची एएफसी आशियाई चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : भारतीय फुटबॉल २३ वर्षांखालील संघात कोल्हापूरचा आघाडीचा फूटबॉलपटू अनिकेत जाधव याची आज निवड झाली. एएफसी अंडर २३ आशियाई चषक स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये २५ ते ३१ ऑक्टोबर या काळात होणार आहे. भारतीय संघात निवड होणारा अनिकेत कोल्हापुरातील पहिलाच फुटबॉलपटू आहे.

सामन्याला जाण्यापूर्वी भारतीय संघातील सर्व खेळाडू बंगळूर येथे सराव करणार आहेत. संघात एकूण २८ खेळाडू आहेत. स्पर्धेसाठी भारताचा ई गटात समावेश आहे. या गटात ओमान, करगीज रिपब्लिक व यजमान यूएई यांचे आव्हान भारतीयांसमोर आहे. अनिकेत सध्या हैदराबाद एफसीकडून खेळत आहे. यापूर्वी तो जेमशेटपूर एफसी, इंडियन ॲरो, पुणे एफसीकडून खेळला आहे.

अनिकेतची जडणघडण कोल्हापुरात झाली. स्थानिक संघातून त्याने विविध आघाड्यांवर नेत्रदीपक कामगिरी केली. प्रतिकूल परिस्थितीत त्याने सराव करीत बारकावे आत्मसात केले. राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत ठसा उमटविला. जिगरबाज म्हणून त्याने नाव कमावले. दिवसभरात कोल्हापुरातील शौकिनांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. दरम्यान, अनिकेतने यापूर्वी भारतात झालेल्या विश्वचषक युवा फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत खेळणारा तो महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू आहे.

संघ असा -

गोलरक्षक : धीरज सिंह मोईरंगथेम, प्रभुसुख सिंग गिल, प्रतिककुमार सिंह, मोहम्मद नवाज, फॉरवर्ड - अनिकेत जाधव, विक्रम प्रताप सिंग, रहीम अली, रोहित दानू, बचावपटू ः नरेंद्र गहलोत, बिकास युन्नम, ॲलेक्स साजी, होमर्मी रूईवा, हेलन नोगटूड, आशिष राय, सुमित राठी, आकाश मिश्रा, साहिल पवार, मिडफिल्डर ः एस. के. साहिल, सुरेश सिंग, अमरजित सिंग, लेलेगमाविया, जॅक्सन सिंग, दीपक टांगरी, राहुल के. पी. कोमल थटल, निकिल राज, ब्रायस मिरांडा, पिन्सटन रिबेलो.

''२०१९ नंतर मला आता भारताची जर्सी घालण्यास मिळणार आहे. त्याचा विशेष आनंद होतोय. या निवडीसाठी मी गेली दोन वर्षे मेहनत घेतली. स्पर्धेत अजूनही चांगला खेळ करून सर्व भारतीयांना अभिमान वाटेल, अशी कामगिरी बजावणार आहे. माझ्या संपूर्ण प्रवासात माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, प्रशिक्षक जयदीप अंगीरवाल यांचे नेहमीच सहकार्य मिळाले.''

- अनिकेत जाधव, फुटबॉलपटू

loading image
go to top