
नृसिंहवाडी : ‘राज्यातील आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. यामुळे निष्ठावान शिवसैनिकाला संधी मिळू शकते,’ असे मत शिवसेना (ठाकरे गट) खासदार अनिल देसाई यांनी येथे व्यक्त केले. नृसिंहवाडी येथे सदिच्छा भेट व दत्त दर्शनप्रसंगी माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते बोलत होते.