Anil Deshmukh: ईडीच्या धाकानं 'ते' राष्ट्रवादी सोडून गेले, मलाही...; अनिल देशमुखांनी मांडला लेखाजोखा

कोल्हापूरमध्ये शरद पवारांची सभा पार पडली यावेळी देशमुखांनी फोडाफोडीच्या राजकारणावरुन भाजपवर निशाणा साधला.
Anil Deshmukh
Anil Deshmukhsakal

कोल्हापूर : शरद पवारांची साथ सोडून भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्यांवर माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी कोल्हापुरातील सभेतून जोरदार हल्ला चढवला. ईडीच्या धाकानं हे लोक राष्ट्रवादी सोडून गेले, अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला. (Anil Deshmukh targetd NCP leaders who go with BJP in Power in Kolhapur rally)

Anil Deshmukh
"...तर भाजपला भीमटोला देण्याची गरज"; कोल्हापुरातील पवारांच्या सभेत रोहित पाटील आक्रमक

अनिल देशमुख म्हणाले, "महाराष्ट्रात स्वतःच्या ताकदीवर भाजप सरकार आणू शकत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर वर्षभरापूर्वी भाजपनं फोडाफोडीचं राजकारण सुरु केलं. आधी त्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले. शिवसेनेचे आमदार कशा पद्धतीनं फोडले आपल्या लक्षात आहेच.

पन्नास पन्नास खोके घेऊन शिवसेनेचे आमदार भाजपसोबत सामिल झाले. नंतर भाजपच्या लक्षात आलं की, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली जेवढे आमदार आपल्यासोबत आले आहेत. त्यानंतरही भाजपला जो फायदा व्हायला पाहिजे तो होत नसून नुकसानच झालं आहे. त्यामुळं मग त्यांनी दुसरा प्रयोग केला. राष्ट्रवादीचे आपले सहकारी होते ते आपल्याला सोडून भाजपच्या सरकारमध्ये सामिल झाले" (Latest Marathi News)

Anil Deshmukh
President Rule: पंजाबच्या राज्यपालांचा मुख्यमंत्र्याना अंतिम इशारा! "उत्तर द्या, अन्यथा राष्ट्रपती राजवट...."

मलाही धाक दाखवला

शरद पवारांमुळं आपले हे सहकारी मोठे झाले होते. ते आपल्याला का सोडून गेले तर ईडीच्या धाकानं गेले सगळे. ईडीची भीती तर मलाही होती. ईडीचा धाक मलाही दाखवला होता, हमारे साथ समझौता करो. पण मी म्हटलं आयुष्यभर तुरुंगात जाईल पण समझौता करणार नाही, अशा शब्दांत देशमुखांनी सगळा लेखाजोखा मांडला. (Marathi Tajya Batmya)

Anil Deshmukh
Firing Maha Bodhi Vihar: गयाच्या महाबोधी विहार परिसरात गोळीबार; एका पोलिसाचा मृत्यू

परमबीर सिंहांना खोटे आरोप करायला लावले

परमबीर सिंहला माझ्यावर खोटे आरोप करायला लावले. जेव्हा केस कोर्टात गेली माझ्यावर १०० कोटींचा आरोप केला होता. न्या. चांदीवाल यांच्या कोर्टानं सांगितलं की, परमबीरला कोर्टात बोलवा त्यांचा जबाब घ्यायचा आहे. शेवटी सहा सात वेळा समन्स बजावूनही ते कोर्टात आले नाहीत.

त्यानंतर परमबीर सिंह यांनी कोर्टाला प्रतिज्ञापत्र दिलं आणि त्यात म्हटलं, अनिल देशमुखांवर मी आरोप केलेत त्यात तथ्य नाही, याचे कोणतेही पुरावे माझ्याकडं नाहीत. हे सर्व आरोप मी ऐकीव माहितीच्या आधारे केले होते. पण हे करता करता १४ महिने लागले तोपर्यंत मला तुरुंगात डांबण्यात आलं. पण मी घाबरलो नाही, पवार साहेबांची साथ सोडणार नाही म्हटलं आणि आज खंबीरपणे त्यांच्यासोबत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com