'ACB'ची धडक कारवाई; इचलकरंजी पालिकेतील दोघेजण जाळ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ACB

बंद काळात लाच स्विकारताना दोन अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

'ACB'ची धडक कारवाई; इचलकरंजी पालिकेतील दोघेजण जाळ्यात

इचलकरंजी : इचलकरंजी नगरपालिकेत दोन कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ सापडले. लालुचपत प्रतिबंध विभागाने पालिकेच्या नगररचना विभागातील दोघांना लाच घेताना पकडले. बांधकाम परवान्यांच्या कामासाठी दोघेजण 20 हजारांची लाच घेत होते. बबन खोत व किरण कोकाटे अशी त्यांची नावे आहेत. एकीकडे पालिकेचे कर्मचारी आपल्या न्याय हक्कांसाठी कामबंद करून लढा देत आहेत. तर दुसरीकडे बंद काळात लाच स्विकारताना दोन अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे नगरपालिकेत खळबळ उडाली आहे. (बातमी अपडेट होत आहे.)

हेही वाचा: विधान परिषदेसाठी कोल्हापुरात भाजपकडून अमल महाडिक

loading image
go to top