कोल्हापूर - टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांचे निधन

कोल्हापूर - टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांचे निधन
Summary

विद्यार्थी दशेपासूनच निवासराव साळोखे राजकीय आणि सामाजिक चळवळीत सक्रिय होते.

कोल्हापूर : टोल आम्ही देणार नाही, असे राज्य सरकारला ठणकावून सांगणारे कोल्हापूर शहर, जिल्हा टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक, शहरातील बालगोपाल तालमीचे अध्यक्ष निवासराव साळोखे (वय 81) यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. (kolhapur update) काही दिवसांपासून ते आजारी होते. उपचार सुरू असतानाच खाजगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. सकाळी 8 वाजता मंगळवार पेठेतील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघाली. यामध्ये अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले. निवासराव साळोखे (nivasrao salokhe) (तात्या) यांना अखेरचा निरोप देण्यात आला. (kolhpur news)

कोल्हापूर - टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांचे निधन
'गावांना विश्‍वासात घेतले, तरच हद्दवाढ करता येईल'

विद्यार्थी दशेपासूनच निवासराव साळोखे राजकीय आणि सामाजिक चळवळीत सक्रिय होते. राजाराम महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. शेतकरी कामगार पक्षाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस पक्ष (congress) रुजवण्यासाठी माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केले. यासोबतच माजी उपमहापौर बळीराम पोवार, पी.एस. साळोखे, यांच्या सहकार्याने त्यानी सामाजिक राजकीय क्षेत्रात काम केले. 2010 पासून कोल्हापूर शहरात बांधा वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्वावर रस्ते विकास प्रकल्प राबवला गेला. या प्रकल्पाला निवासराव साळोखे यांनी पहिल्यापासून विरोध केला.

रस्ते प्रकल्पाच्या मोबदल्यात आकारण्यात येणाऱ्या टोलला विरोध करत आणि सरकार आणि आयआरबी कंपनीला (IRB) कोल्हापूरी हिसका दाखविण्यासाठी त्यांनी टोल विरोधात आंदोलनासाठी संघटन करायला सुरुवात केली. ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखाली 'टोल'ला टोला देण्यामध्ये हे आंदोलन यशस्वी ठरले. या आंदोलनात निवासराव साळोखे (तात्या) यांचे योगदान मोठे होते. मध्यंतरी वृक्ष लागवडीचा एक मोठा प्रकल्पही त्यांनी राबवला. त्यामध्येही त्यांना यश आले. अशा सामाजिक राजकीय कार्यकर्त्याचे आज निधन झाले. बुधवारी सकाळी ९ वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे रक्षा विसर्जन होणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सुन, जावई नातवंडे असा परिवार आहे.

कोल्हापूर - टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांचे निधन
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; उद्यापासून दहावी-बारावीचे वर्ग सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com