हिंसाचारासह दहशतीच्‍या प्रकारांना चोख उत्तर; कोल्हापूरात एलसीबी,दहशतवाद विरोधी पथकासह सायबर सेल सतर्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंसाचारासह दहशतीच्या प्रकारांना चोख उत्तर

दहशतवाद विरोधी पथक, सायबर सेल व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग हिसांचार अगर दहशतीला खतपाणी घालण्याचे प्रकार घडतात का? कोल्हापूर पोलिसांकडेही अशी पथके आहेत.

हिंसाचारासह दहशतीच्या प्रकारांना चोख उत्तर

कोल्हापूर : हिंसाचार व दहशतीपासून देशाचे व समाजाचे रक्षण करण्यासाठी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सतर्क असते. त्यांना मदत करण्यासाठी स्थानिक पोलिसही तितक्यात हिरीरीने सज्ज असतात. त्याचाच भाग म्हणून जिल्हावार दहशतवाद विरोधी पथक, सायबर सेल (LCB,cyber cell alert, anti-terrorism squad)व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग हिसांचार अगर दहशतीला खतपाणी घालण्याचे प्रकार घडतात का? याचा छुपा वेध घेत असतात. कोल्हापूर (Kolhapur Police)पोलिसांकडेही अशी पथके आहेत. त्‍यांनी बारकाईने गोपनीय माहिती संकलित करत राज्यांतर्गत आणि सोशल मीडियांअंतर्गत दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. विष्णोई टोळीवर थरारक कारवाई करत त्याची झलकही त्यांनी दाखवली आहे.(Anti-Violence-Day-Special-LCB-cyber-cell-alert-with-anti-terrorism-squad-kolhapur-news)

जिल्ह्यात हिंसाचारासह दहशती संबधी खतपाणी घालणारे काही प्रकार वेळीच मोडून काढण्याचे काम पथकांकडून केले जाते. दहशतवाद विरोधी पथकासाठी जिल्ह्यात स्वतंत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते. जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे, मंदिरे, वास्तूच्या संरक्षणासाठी हे पथक कार्यरत असते. एसटी स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी आढळणाऱ्या बेवारस वस्तूची शहानिशा करण्यापासून ती घातक असल्यास नष्ट करण्याचे काम बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून केले जाते.

हेही वाचा- गडचिरोलीच्या जंगलात एन्काऊंटर, सहा नक्षलवाद्यांना कंठस्नान

सोशल मीडियाद्वारे आक्षेपार्ह संदेश हिंसाचार अगर तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने व्हारयरल करणाऱ्यांवर सायबर सेल वॉच ठेवतो. अशा समाजकंटकांचा शोध घेण्याचे काम सायबर सेल करते. जिल्ह्यात हिंसाचारासह दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांची गोपनीय माहिती संकलित करून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) शाखेकडून सुरू आहे. यामुळेच जिल्ह्यात सलोख्याचे वातावरण आहे.

प्ररप्रांतिय टोळीच्या आवळल्या मुसक्या...

राजस्थान येथील विष्णोई गँगमधील तिघेजण हुबळीहून पुण्याकडे जाणार असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाने सायबर सेलच्या मदतीने मिळवली. किणी टोल नाक्यावर सापळा रचून त्यांच्याशी दोन हात केले. यावेळी उडालेल्या चकमकीत पोलिसांनी गँगमधील तिघांना जेरबंद केले; तसेच सरनोबतवाडी परिसरात नाव बदलून भाडेकरू म्हणून राहणाऱ्या राजस्थान येथील रेकॉर्डवरील गुन्हेगाराची माहिती काढून राजस्थान पोलिसांच्या मदतीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले.

loading image
go to top