Kolhapur : नवीन १४ मतदान केंद्रांना मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

नवीन १४ मतदान केंद्रांना मंजुरी

कोल्हापूर : विधान परिषदेच्या कोल्हापूर मतदारसंघामध्ये १२ नवीन मतदान केंद्र निश्‍चित करून मिळावीत, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने भारत निवडणूक आयोगाकडे दिला होता. त्यानुसार आज याला मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्यात १० डिसेंबरला मतदान व १४ डिसेंबरला मतमोजणी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाकडून सर्व तयारी केली आहे.

दरम्यान, ज्या ठिकाणी मतदार जास्त आहेत, त्या ठिकाणी मतदान केंद्र वाढवून मिळावीत यासाठी सोमवारी (ता. १५) प्रस्ताव पाठवला होता. त्याला आज मंजुरी मिळाली. यामुळे मतदान घेण्यास अडथळा येणार नाही. याशिवाय, मतदान यंत्रणेवर ताण पडला जाणार नाही.

पन्हाळा मतदान केंद्राची पाहणी

कोल्हापूर : विधान परिषदेच्या कोल्हापूर मतदारसंघातील निवडणूक निरीक्षक वरिष्‍ठ सनदी अधिकारी रणजितसिंह देओल यांनी आज पन्हाळा येथील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी श्री. देओल यांनी मतदानावेळी खबरदारी घ्यावी अशा सूचना दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी भैरप्पा माळी, संपर्क अधिकारी तथा एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे, तहसीलदार रमेश शेंडगे उपस्थित होते.

निवडणूक निरीक्षकांचा तळ

विधान परिषदेसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून आलेले श्री. देओल ताराबाई पार्क येथील शासकीय विश्रामगृहात असणार आहेत. त्यांचा ८८३०५९५८८९ हा मोबाईल क्रमांक आहे. निवडणुकीसंदर्भात काही तक्रार असल्यास, आचारसंहिता भंग होत असेल तर या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

मंजूर मतदान केंद्रे :

 1. करवीर तालुका - जिल्हा परिषद इमारतीमधील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचनालय

 2. चंदगड तालुका- तहसील कार्यालय, तहसीलदार कक्ष

 3. आजरा तालुका : तहसील कार्यालय, तहसीलदार कक्ष

 4. गडहिंग्लज - तहसील कार्यालय, तहसीलदार कक्ष

 5. राधानगरी- तहसील कार्यालय, तहसीलदार कक्ष

 1. भुदरगड - सार्वजनिक बांधकाम इमारत, उत्तर बाजू खोली, गारगोटी

 2. कागल- शाहू सुविधा केंद्र, तहसील कार्यालय

 3. गगनबावडा- तहसील कार्यालय, तहसिलदार कक्ष

 4. पन्हाळा - नगरपरिषद हॉल

 5. शाहूवाडी- नगरपरिषद हॉल

 6. हातकणंगले - तहसीलदार कार्यालय, तहसीलदार कक्ष

 7. शिरोळ - तहसीलदार कार्यालय, तहसीलदार कक्ष

loading image
go to top