
कलापूरच्या ५२ विद्यार्थ्यांच्या कलाकृती राज्य प्रदर्शनात
कोल्हापूर : राज्य कला संचालनालयातर्फे होणाऱ्या यंदाच्या एकसष्ठाव्या राज्य कला प्रदर्शनात शहरातील तीन महाविद्यालयांतील तब्बल ५२ विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची निवड झाली आहे. रा. शि. गोसावी कलानिकेतन महाविद्यालयातील एकवीस, कलामंदिर महाविद्यालयातील सोळा तर दळवीज् आर्टस् इन्स्टिट्यूटच्या पंधरा विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचा त्यामध्ये समावेश आहे. दरम्यान, यंदा व्यावसायिक विभागाबरोबरच विद्यार्थ्यांनीही प्रदर्शनात बाजी मारली आहे.
कलानिकेतन महाविद्यालयाच्या उपयोजित कला विभागातून अभिजित भोसले, सुशांत सुतार, विनायक कांबळे, प्रथमेश पाटील, पायल लाड, आरमान मुल्लाणी, प्रणव माळी, समृद्धी मंडलिक, श्वेता पाटील, अद्वेत रामदासी, श्रुती जाधव यांच्या तर मूलभूत अभ्यासक्रम विभागात चेतना सुतार, अनुराधा पवार, तनया खटावकर, शार्दुल कुंभार, ओम म्हामुलकर, प्रथमेश सुतार, सिद्धी जाधव यांच्या आणि एटीडी विभागात आयेशा शेख, श्रावणी पवार, अनुराधा कोळी यांच्या कलाकृतींची निवड झाली आहे.
दळवीज् आर्टस् इन्स्टिट्यूटच्या डिप्लोमा पेंटिंग विभागातून साक्षी लोणकर, ॲडव्हान्स पेंटिंग विभागातून प्रणोती चौगुले, केदार पोवार, सृष्टी पाटील, इंटरमिजीएट पेंटिंगवर्गातून साक्षी पांगिरे, धोंडी ढवळे, ऋतुजा जाधव, एलिमेंटरी पेंटिंग विभागातून आर्या माने, आकाश जाधव, कशिश पटेल, कशिश अडसूळ, रोहिणी कांबळे, शिवयोगी बडिशेर, मूलभूत अभ्यासक्रम वर्गातून प्रतीक कांबळे, स्नेहल खराडे यांच्या कलाकृतींची निवड झाली आहे. स्नेहल आणि शिवयोगी यांच्या दोन कलाकृती प्रदर्शनात असतील.
कलामंदिर महाविद्यालयाच्या फाउंडेशन विभागातील स्वप्निल कुंभार, पेंटिंग विभागातील सुप्रिया सुतार, ओंकार वागवेकर, शिल्पकला विभागातील दिगंबर कुंभार, प्रथमेश कुंभार, केवल सावंत, विशाल दुग्गल, विकास हरमलकर, सिद्धेश सुतार, रविचंद्र गोरे, जीवन कुंभार, वैभव पाटील, कैलास कुंभार, स्वागत कुंभार, आदित्य कुंभार, वैभव अटाळकर यांच्या कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
Web Title: Art Exhibitions Of 52 Students Of Kalapur 61st National Exhibition Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..