"गोकुळ'मध्ये हसन मुश्रीफ यांच्या सोबत अरुण डोंगळे

 Arun Dongle with Hasan Mushrif in "Gokul"
Arun Dongle with Hasan Mushrif in "Gokul"

राशिवडे बुद्रुक  ः  कोल्हापूर ल्हा दूध संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत ग्रामविकास मंत्री व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचे नेतृत्व मान्य करून त्यांच्यासोबतच असेन, असे स्पष्ट प्रतिपादन गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी केले. आज दुर्गमानवाड (ता. राधानगरी) येथे झालेल्या त्यांच्या गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते. त्यांनी आपण राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही, असे ही यावेळी स्पष्ट केले. श्री. मुश्रीफ यांच्या उपस्थितीतच हा मेळावा झाला. 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्री डोंगळे यांचे पुत्र अभिषेक व त्यांच्या युवा मंचने दुर्गमानवाड येथे रक्तदान शिबिर आणि मेळाव्याचे आयोजन केले होते. जरी युवा मंच संयोजक असले तरी हा सर्व कार्यक्रम अरुण डोंगळे या नावाने व्यापला होता. तालुक्‍यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आवर्जुन हजर होते. माजी आमदार के. पी. पाटील, धैर्यशील पाटील यांना प्रामुख्याने निमंत्रित असूनही त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. 
कार्यक्रमस्थळी श्री. मुश्रीफ येताच श्री. डोंगळे यांनी कार्यकर्त्यांना संबोधत करताना "मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार हा भ्रम कार्यकर्त्यानी आधी दूर करावा. मी प्रवेश करणार नसलो तरी गोकुळच्या निवडणुकीत मुश्रीफ यांचे नेतृत्व मान्य करून यांच्या सोबत राहीन, अशी घोषणाच केली. त्यानंतर दोन्ही नेते विठ्ठलाई देवीच्या दर्शनासाठी गेले. तिथे मुश्रीफ यांनी डोंगळे यांचा संकल्प फलद्रूप होऊ दे., असे गाऱ्हाणे घातले यामुळे "गोकुळ'च्या निवडणुकीत डोंगळे या गटासोबत असतील यावर शिक्कामोर्तब झाला. 
दुसरीकडे या मेळाव्याला श्री. डोंगळे आणि राष्ट्रवादीचे ए. वाय. पाटील त्यांच्या गटाचे कार्यकर्ते दिसून आले. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली होती. शिवाय धैर्यशील पाटील गटाचे ही कोण आढळले नाही. दुर्गमानवाडवर झालेला हा मेळावा ए. वाय. पाटील आणि अरुण डोंगळे यांच्याच प्रभावाखाली होता. यामुळे गोकुळ दूध संघ आणि जिल्हा मध्यवर्ती बॅंक या निवडणुकीच्या अनुषंगाने ही व्यूहरचना असल्याचीही चर्चा कार्यक्रम होती. 
खुद्द श्री. डोंगळे यांचे पुतणे "भोगावती'चे संचालक धीरज यांच्यासह यांचे कट्टर समर्थक संचालक बी. आर. पाटील, संजयसिंह पाटील यांचीही अनुपस्थिती चर्चेची ठरली. गेली अनेक वर्षे डोंगळे यांच्यासोबत सावलीसारखे असणारे बिनीचे कार्यकर्तेही या मेळाव्यात दिसले नाहीत. तरीही गेलीअनेक वर्ष गोकुळवर राज्य करणाऱ्या अरुण डोंगळे यांचा निर्णय जिल्ह्याच्या राजकीय पटलावर विशेषतः गोकुळ निवडणुकीमध्ये धक्कादायक ठरण्याची शक्‍यता आहे. 

चर्चा...उपस्थिती अन्‌ अनुपस्थितीची ! 
कसबा तारळे ः प्रारंभी आमदार पी. एन. पाटील, भोगावती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर आदींना या रक्तदान शिबिर व जत्रेसाठी निमंत्रित केल्याची चर्चा होती; परंतु पी.एन.यांच्यासह त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या भोगावतीच्या विद्यमान संचालकांची आजची अनुपस्थिती आणि ए. वाय.पाटील व डोंगळे समर्थकांची उपस्थिती आज चर्चेचा विषय ठरली.

- संपादन - यशवंत केसरकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com