कोल्हापूर : जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) पुढील अध्यक्ष महायुतीचाच (Mahayuti) व्हावा, म्हणून राजीनामा न दिलेले विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे (Arun Dongle) यांची अवस्था युद्धात आणि तहातही हरल्यासारखी झाली. परिणामी बुधवारऐवजी त्यांना आजच आणि नेत्यांची मुंबईतील बैठक होण्यापूर्वीच राजीनामा देण्याची वेळ तर आलीच; पण या प्रकाराने त्यांनी नेत्यांची विश्वासार्हताही गमावल्याचे स्पष्ट झाले.