कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे (Arun Dongle) यांनी आपली तलवार म्यान केली आहे. ते, बुधवारी (ता. २१) आपल्या पदाचा राजीनामा देण्यास तयार झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी ‘गोकुळ’चे नेते आज (ता. २०) जाणार असले तरी डोंगळे मात्र आजच मुंबईत दाखल झाले. रात्री उशिरा ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.