esakal | ‘ज्ञानेश्वर माऊलीच्या गजरात सजवलेल्या वाहनातून निघाली वारी
sakal

बोलून बातमी शोधा

‘ज्ञानेश्वर माऊलीच्या गजरात सजवलेल्या वाहनातून निघाली वारी

‘ज्ञानेश्वर माऊलीच्या गजरात सजवलेल्या वाहनातून निघाली वारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानराज माऊली तुकाराम..‘, ‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम...’ असा अखंड गजर करीत आज मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत येथील प्रतिपंढरपूरवारीचे प्रस्थान सकाळी झाले. मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात पहाटे अभिषेक व महापूजा झाल्यानंतर आठच्या सुमारास दिंडीने फेर धरला. (Ashadi Ekadashi 2021 Pratipandharpur Nandwal kolhapur update akb84)

मंदिर परिसरातच काही पावलं प्रतिकात्मक दिंडी काढून पालख्या व मोजकेच वारकरी सजवलेल्या वाहनांतून प्रतिपंढरपूर अर्थात नंदवाळकडे रवाना झाले. वसंतराव देशमुख, ऋतूराज क्षीरसागर, रणवीर शिर्के, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव, वाहतूक निरीक्षक स्नेहा गिरी आदींच्या प्रमुख उपस्थितीत येथे आरती झाली.

हेही वाचा: कोल्हापूरला मोठा दिलासा! पूरबाधित 129 गावांत ‘हायटेक दवंडी’

दरम्यान, नंदवाळ येथील विविध धार्मिक विधी झाल्यानंतर वाहनातूनच दिंडी पुन्हा मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिरात येईल. नंदवाळची यात्रा रद्द करण्यात आली असून, गावाकडे जाणारे तिन्ही मार्ग बॅरिकेड्‌सद्वारे बंद करण्यात आले आहेत. याठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विठ्ठल मंदिरे दर्शनासाठी बंदच आहेत. भाविकांना बाहेरूनच दर्शन दिले जात असून भाविकांनी मंदिराच्या बाहेरच प्रसाद वाटपावर भर दिला आहे. आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या भाव-भक्तीगीतांच्या मैफलही यंदा रद्द केल्या असल्या तरी त्याची अनुभुती सोशल मीडियावरून विविध संस्थांनी दिली आहे. यापूर्वीच्या मैफलींचे प्रक्षेपण सोशल मीडियावरून करण्यात आले.

loading image