esakal | गोकुळ रणांगण; 'पाहुणचार केला म्हणजे पाठिंबा दिला असं नाही'

बोलून बातमी शोधा

null

गोकुळ रणांगण; 'पाहुणचार केला म्हणजे पाठिंबा दिला असं नाही'

sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीनिमित्त जिल्ह्यातील मंत्री भेटायला आले. त्यांना चहा-पाणी देवून पाहुणचार केला म्हणजे त्यांना पाठिंबा दिला नाही, अशी स्पष्ट भूमिका जिल्हा बॅंकेचे संचालक अशोक चराटी यांनी आज घेतली. त्यांनी गोकुळमध्ये विरोधी पॅनेलला नव्हे तर आमदार पी.एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या सत्तारूढ पॅनेलला पाठिंबा जाहीर केल्याचे असल्याचे श्री. सराटी यांनी सांगितेल.

दोन दिवसापूर्वी जिल्हा बॅंकेचे संचालक व आजरा कारखान्याचे माजी चेअरमन अशोक चराटी यांनी विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला पाठिंबा दिल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जाहीर केले होते. दरम्यान आज अशोक चराटी यांनी गोकुळच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीला पाठिंबा जाहीर करुन विरोधी आघाडीला मोठा धक्का दिला आहे.

हेही वाचा: ब्रेकिंग - गोकुळ रणांगण; राजू शेट्टी सत्ताधाऱ्यांसोबत

यावेळी चराटी म्हणाले, कोणत्याही निवडणूकीत लोक एकमेकांना भेटत असतात. नेते, उमेदवार घरी येतात. त्यामुळे घरी आलेल्या लोकांचा पाहुणचार केला जातो. आपल्या घरीही विरोधी आघाडीचे नेते आले होते. त्यांचा चहापान देवून पाहुणचार केला. याचा अर्थ त्यांना पाठिंबा दिला असे नाही. जिल्ह्याच्या आणि गोकुळच्या राजकारणात आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक हेच आपले नेते आहेत. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीला आपला पाठिंबा असल्याचेही त्यांनी जाहीर केले.