esakal | ब्रेकिंग - गोकुळ रणांगण; राजू शेट्टी सत्ताधाऱ्यांसोबत

बोलून बातमी शोधा

ब्रेकिंग - गोकुळ रणांगण; राजू शेट्टी सत्ताधाऱ्यांसोबत
ब्रेकिंग - गोकुळ रणांगण; राजू शेट्टी सत्ताधाऱ्यांसोबत
sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी गोकुळ निवडणूकीत सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान आता स्वाभिमानी शेतकरी संघटना गोकुळच्या निवडणुकीत सहभागी होणार असून राजू शेट्टी यांनी राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा असल्याचे सांगितले आहे.

दरम्याना काल (मंगळवारी) माजी खासदार राजू शेट्टी, धनंजय महाडिक व माजी आमदार संजय घाटगे यांनी भेट घेतली होती. माजी खासदार महाडिक व माजी आमदार घाटगे यांनी शिरोळ येथे राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी बंद खोलीत काही काळ चर्चा केली होती. या चर्चेनंतर संघटनेचे प्रमुख शिलेदार सावकर मादनाईक, संघटनेचे तालुकाध्यक्ष राम शिंदे यांच्यासमवेतही चर्चा केली. सत्ताधारी राजश्री शाहू आघाडीने दूध उत्पादकांचे हित जोपासले आहे. यामुळे स्वाभिमानीच्या ठरावधारक मतदारांनी सत्ताधारी पॅनेलच्या मागे राहावे, अशी आग्रही मागणी केली.

हेही वाचा: 'गोकुळ'चे कोरोना बाधित ठरावदार पीपीई किट घालून करणार मतदान