Ashwini Bidre case latest update
esakal
कोल्हापूर
Police Officer Ashwini Bidre Case : पत्नीची हत्या कोर्टात स्पष्ट, 10 वर्षांनंतरही मृत्यूचा दाखला मिळेना; अश्विनी बिद्रेंच्या पतीची इच्छामरणाची मागणी
Mercy Killing Plea to President and Chief Justice : महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या हत्येनंतर दहा वर्षे उलटूनही मृत्यू दाखला न मिळाल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे.
कोल्हापूर : महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाला (Ashwini Bidre Case) तब्बल दहा वर्षे उलटूनही न्याय मिळाला नसल्याचा आरोप करत त्यांच्या कुटुंबीयांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. बिद्रे यांच्या कुटुंबीयांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आणि देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे.
