
गडहिंग्लज : किरकोळ कारणावरून लोखंडी सळीने झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या नागोंडा चंद्रकांत पाटील (वय ५९, रा. करंबळी, ता. गडहिंग्लज) यांचा कोल्हापूरच्या सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेतील संशयित महादेव भीमा सावंत (रा. शिप्पूर तर्फ आजरा, ता. गडहिंग्लज) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली.