
कोल्हापूर : पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून खात्यातील ८० हजार रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला. दोन जानेवारी रोजी घडलेल्या प्रकाराबाबत मोहन देवाप्पा राजरत्न (वय ५७, रा. तामगाव, ता. करवीर) यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अकरा वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनद्वारे पैसे हडपल्याचे उघड झाले.