इब्राहिमपूर गावाला (Ibrahimpur) लागूनच गढीवर प्राचीन जैन मंदिरे आणि तिथून काही अंतरावर प्राचीन महादेव मंदिर आहे.
चंदगड : विकासाच्या नावाखाली इब्राहिमपूर (ता. चंदगड) येथील प्राचीन जैन मंदिरांची (Jain Temple) रचना बदलण्याचा प्रयत्न रोखल्याची माहिती सरपंच तुकाराम हरेर यांनी दिली. हे काम थांबवण्याबाबत नोटीस बजावली असून, पुरातत्त्व विभागाची (Archaeology Department) परवानगी घेऊनच कामाला सुरुवात करावी, अशी सूचना केली असल्याचे त्यांनी सांगितले.