कासारवाडीची स्मशानभूमी (Kasarwadi Cemetery) गावाबाहेर अंबपवाडी रस्त्यालगत आहे. या रस्त्यावर वर्दळ नेहमीच कमी असते. याचा गैरफायदा काही भोंदू बाबा घेऊ लागले आहेत.
टोप : कासारवाडी (ता. हातकणंगले) येथील स्मशानभूमीत गुरुवारी अमावास्येच्या रात्री अघोरी पूजा करण्याच्या प्रयत्नात असणारा भोंदूबाबा नागरिकांची चाहूल लागताच पसार झाला. येथील स्मशानभूमीत अघोरी पूजा, करणी, भानामतीचे प्रकार वाढले आहेत. अंधश्रद्धा वाढवणाऱ्या घटनांना प्रतिबंध कसा करायचा, असा प्रश्न नागरिकांसमोर असून, यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.