डिजिटल प्रश्नावलीद्वारे कोरोनाबाबत जागृती

Awareness About Corona Through Digital Kolhapur Marathi News
Awareness About Corona Through Digital Kolhapur Marathi News
Updated on

इचलकरंजी : कोरोनामुळे सर्वच महाविद्यालय बंद आहेत. तरी सुध्दा प्रत्येक महाविद्यालयाने कोरोनाबाबत डिजीटल माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे. कोरोनाविषयी जागृती, घ्यावयाची काळजी, उपाय याबाबतची प्रश्‍नावली डिजीटल लिंक स्वरूपात तयार केली आहे. जवळपास सर्वच महाविद्यालयांनी हा जनजागृतीचा अनोखा फंडा तयार केल्याने विद्यार्थी, नागरिक ही प्रश्‍नावली सोडवून या जनजागृतीच्या मोहिमेत अग्रेसर आहेत. 

प्रत्येक महाविद्यालयाने कोरोनाबाबत जनजागृतीसाठी नामी शक्कल शोधून काढली आहे. कोरोनाबाबत विद्यार्थी, नागरिक जागृत व्हावेत व योग्य ती काळजी घ्यावी यासाठी थेट सोशल मिडीयाच्या माध्यमातून डिजीटल प्रश्‍नावली तयार केली आहे. या प्रश्‍नावलीची ऑनलाईन लिंक व्हाटसअपच्या माध्यमातून विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. त्यानुसार या प्रश्‍नावलीत दिलेले कोरोना संबंधीत सर्व प्रश्‍न सोडविले जात आहेत.

प्रश्‍नावली सोडवल्यानंतर प्रत्येकाला सहभागी झाल्याचे डिजीटल प्रमाणपत्र ईमेल अथवा त्याच लिंकवर प्राप्त होत आहे. दिलेल्या लिंकवर वैयक्तीक माहिती अद्यावत केल्यानंतरच प्रश्‍न सोडवता येतात. ही प्रश्‍नावली इंग्रजी भाषेत आहे. पण डिजीटल प्रमाणपत्र प्राप्त होण्यासाठी काही महाविद्यालयांनी 70 टक्के गुण मिळविणे बंधनकारक केले आहे. प्रत्येक महाविद्यालयात नॅकच्या अंतर्गत मुल्यमापन गुणवत्ता कक्षातर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

व्याप्ती वाढत आहे
कोरोना जागृती उपक्रमांतर्गत डिजीटल प्रश्‍नावली तयार केली आहे. कोरोनाबाबत समाजात जनजागृती करणे हा उद्देश असून याची व्याप्ती वाढत आहे. घरबसल्या या उपक्रमात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, नागरिक सहभागी होत आहेत. 
- अनिल पाटील, प्राचार्य, कन्या महाविद्यालय, इचलकरंजी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakal 46th Foundation Day Celebration Professor S Mahendra Dev Stresses Sustainable Growth Through Agriculture Industry
Fulfilling an Old Pact
Prakash Abitkar Ambabai temple conservation news
Kolhapur farmer loan waiver latest news
Marathi News Esakal
www.esakal.com