ऐतिहासिक दसरा चौकात उभारली प्रभू श्रीरामांची तब्बल 108 फुटी भव्य प्रतिमा; मंत्री पाटील, महाडिकांच्या उपस्थितीत आज अनावरण

अयोध्या येथील श्री राम मंदिर लोकार्पणानिमित्त येथे होणाऱ्या आनंदसोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
Ayodhya Ram Mandir SriRama Dasara Chowk Kolhapur
Ayodhya Ram Mandir SriRama Dasara Chowk Kolhapuresakal
Summary

श्रीराम आणि मंदिर प्रतिकृती असलेल्या भगव्या ध्वजासह टी-शर्ट, आकाशकंदिलांना मागणी वाढली आहे.

कोल्हापूर : अयोध्या येथील श्री राम मंदिर लोकार्पणानिमित्त येथे होणाऱ्या आनंदसोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. काल रात्री ऐतिहासिक दसरा चौकात (Dasara Chowk) प्रभू श्री रामांची १०८ फुटी भव्य प्रतिमा उभारण्यात आली आहे. आज (शनिवारी) दुपारी साडेबारा वाजता राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या उपस्थितीत त्याचे अनावरण होणार आहे.

दरम्यान, रविवार (ता.२१) पासून सलग दोन दिवस येथे आनंदसोहळ्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, श्रीराम आणि मंदिर प्रतिकृती असलेल्या भगव्या ध्वजासह टी-शर्ट, आकाशकंदिलांना मागणी वाढली आहे.

Ayodhya Ram Mandir SriRama Dasara Chowk Kolhapur
प्रतापगड किल्ल्याच्या विकासासाठी पुन्‍हा नवीन आराखडा; उपमुख्यमंत्री अजितदादांचा पुढाकार, काय आहे प्रस्ताव?

शिवाजी चौकात प्रतिष्ठापना सोहळ्याचे प्रसारण

श्री राम मंदिर लोकार्पण (Ayodhya Ram Mandir) सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रविवार (ता.२१) पासून येथे आनंदोत्सव सोहळा होणार आहे. छत्रपती शिवाजी चौकात अकरा फुटी भव्य मुर्ती दर्शनासाठी खुली होणार आहे. त्याशिवाय प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रसारण सोमवारी (ता.२२) दुपारी बारापासून होणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे संपर्क प्रमुख संभाजी साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोमवारी (ता. २२) सकाळी गाईच्या पूजनानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर सप्तगंगेच्या जलाने जलाभिषेक होवून गुढी उभारली जाईल, असे प्रसाद वळंजू यांनी सांगितले. यावेळी विशाल पाटील, अवधूत भाटे, पांडुरंग पाटील, अमोल पाटील, सुहास शिंदे आदी उपस्थित होते.

Ayodhya Ram Mandir SriRama Dasara Chowk Kolhapur
शिवाजी विद्यापीठात 57 वर्षांपूर्वीच वाल्मिकी ऋषींच्या 'रामायणा'वर झाले संशोधन; कथेची वेगळ्या भूमिकेतून केली पाहणी

धार्मिक स्थळे, मंदिरांची स्वच्छता

रुईकर कॉलनी परिसरातील मंदिरांची खासदार धनंजय महाडिक यांनी आज महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह स्वच्छता केली. महापालिकेच्या वतीने शहरातील मंदिरांची व मुख्य रस्त्यांची स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील २०९ मंदिरांची स्वच्छता झाली. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, माजी नगरसेवक सत्यजित कदम, वैभव माने, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्यासह महापालिकेच्या तीनशे कर्मचाऱ्यांचा मोहिमेत सहभाग होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com