दाजीपूर अभयारण्य म्हणजे निमसदाहरित वनस्पतींचे जंगल. उन्हाळ्यात पानगळ होणाऱ्या वनस्पती वेगळ्या आणि सदाहरित झुडुपे वेगळी. त्यामुळे येथे सतत हिरवाई आणि नवलाई दिसून येते.
राशिवडे बुद्रुक : कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यांतील मेडिकल आणि फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी दाजीपूरचे जंगल (Dajipur Forest) आयुर्वेदाचा उत्तम स्त्रोत म्हणून उपयुक्त ठरत आहे. आयुर्वेदामध्ये लागणाऱ्या अधिकाधिक वनौषधी या परिसरात उपलब्ध होत असल्याने प्रतिवर्षी मोठ्या संख्येने अभ्यास सहली इकडे येत आहेत. अर्थातच यामुळे दाजीपूर-राधानगरीची ‘आयुर्वेदाची पंढरी’ अशी नवी ओळख पुढे येऊ लागली आहे.