क्वारंटाइन रुग्णांना रोज 15 लिटर काढा

Remove 15 liters daily to quarantine patients
Remove 15 liters daily to quarantine patients
Updated on

कोल्हापूर : शहरामध्ये क्वारंटाईन केलेल्या सुमारे 300 व्यक्तींना दररोज आयुर्वेदिक काढा आणि संमशमनी वटी (गोळी) देण्यात येते. या रुग्णांची रोग प्रतिकारक शक्ती वाढावी, ताप, कफ असेल तर तो नाहिसा व्हावा हा याचा उद्देश आहे. केंद्र सरकारच्या आयुश मंत्रालयाचा हा उपक्रम असून राज्यात केवळ कोल्हापूरमध्येच सुरू आहे. आयुर्वेद व्यासपीठ यांच्यावतीने हा उपक्रम राबवला जातो. 

व्यासपीठचे डॉक्‍टर रोज सुमारे 15 लिटर काढा शहरातील सहा क्वारंटाईन विभागातील तीनशे रुग्णांना सकाळी देतात. तसेच संमशमनी वटी दिवसातून दोन वेळा रुग्ण घेतात. याचे लाभ लक्षात आल्याने राजारामपुरी पोलिस ठाण्यातही हा काढा त्यांच्या मागणीवरून दिला जात आहे. 
कोरोना सदृश्‍य लक्षणे असणाऱ्यांना तसेच कोरोना बाधीत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना संस्थात्मक क्वारंटाईन केले जाते. त्यांच्यासाठी आयुश मंत्रालयाने एक देशव्यापी उपक्रम सुरू केला. हळद, तुळस, सुंठ आणि गूळ यापासून बनवलेला आयुर्वेदीक काढा क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना दिला जातो. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी.

ताप, कफ हे दोष नाहीसे व्हावेत हा यामागचा उद्देश आहे. या काढ्याबरोबर संमशमनी वटी (गोळी) देखील दिली जाते. ही वटी गुळवेल या वेलवर्गीय वनस्पतीपासून बनवलेली असून ती दिवसातून दोन वेळा घ्यायची आहे. आयुश मंत्रालयाचा हा उपक्रम महाराष्ट्रात केवळ कोल्हापुरातच सुरू असून आयुर्वेद व्यासपीठ या संस्थेशी संलग्न असणाऱ्या डॉक्‍टरांनी याला मूर्तरुप दिले आहे. हे डॉक्‍टर रोज 15 लिटर काढा बनवतात आणि प्रत्येकी 50 एम.एल या प्रमाणात 300 व्यक्तींना देतात. यामुळे या रुग्णांना दिवसभर प्रसन्न वाटते. अंगदुखी, कणकण, सर्दी, खोकला असेल तर तेही बरे झाले. याचे फायदे लक्षात घेऊन आता पोलिसांनाही हा काढा दिला जातो. 

काढ्यातील घटक व महत्त्व 
तुळस - ताप आणि कफ कमी करण्यासाठी गुणकारी 
हळद - घसा, श्‍वास नलिका यांना येणारी सूज कमी करते. 
सुंठ - फुप्फुसातील कफ कमी करते, पचनक्रिया सुधारते. 
गुळवेल - वात, पित्त, कफ हे तीनही दोष नाहीसे करते. रक्त शुद्धीसाठी उपयुक्त. 
 
उपक्रमात सहभागी डॉक्‍टर 
डॉ. शुभांगी पारटे, डॉ. सुनिल सुर्यवंशी, डॉ. विश्‍वनाथ पाटील, डॉ. धन्वंतरी बिरनाळे, डॉ. विकास महाडिक, डॉ. चंद्रकांत कुलकर्णी, डॉ. प्रशांत चौगुले, डॉ. चारुलता कुलकर्णी, डॉ. मंगेश ठमके. 
 

हा आयुर्वेदिक काढा रुग्णाची रोग प्रतिकार शक्ती वाढवतो. त्यामुळे क्वारंटाईन रुग्णांसाठी हा लाभदायी आहे. हा आयुष मंत्रालयाचा उपक्रम असून राज्यात केवळ कोल्हापुरातच हा उपक्रम सुरू आहे. आयुर्वेद व्यासपीठच्या डॉक्‍टरांनी समुपदेशन, प्राणायाम या माध्यमातून रुग्णांना मानसिक आधारही दिला आहे. 
- डॉ. शितल देशपांडे, जिल्हाध्यक्ष, आयुर्वेद व्यासपीठ. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur illegal abortion investigation
Radhanagari Dam 100 percent full
Radhanagari Dam 97 percent full update
Girish Mahajan latest statement on Almatti Dam
Marathi News Esakal
www.esakal.com