मतदान नाही म्हणून रस्ता नाही 

bad condition of road in kolhapur
bad condition of road in kolhapur
Updated on: 

कोल्हापूर - पांजरपोळ इंडस्ट्रीयल इस्टेट मधील रस्ता दिसतच नाही. सर्वत्र असलेले खड्डे, दगड, खडी असेच चित्र दिसते. या भागात छोटे कारखाने, वर्कशॉप आहेत. इथे मतदार कमी आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. असे येथील नागरिक सांगतात. 

पांजरपोळ इंडस्ट्रीय इस्टेट परिसर हा महापालिकेच्या मालकीचाच आहे. मात्र येथे रस्त्यांची स्थिती दयनीय आहे. इथे रस्तास दृष्टीपथात येत नाही. सर्वत्र खडी आणि खड्डेच दिसतात. यामुळे हा रस्ता म्हणजे केवळ खडबडीत पायवाटच आहे. गेली तीन ते चार वर्षे हा रस्ता असाच आहे. या रस्त्यावरून सतत वाहनांची वर्दळ सुरू असते. सतत उडणाऱ्या धुळीमुळेही नागरिकांना त्रास होतो. इथे मतदार नसल्याने हा रस्ता केला जात नाही अशी येथील नागरिकांची भावना आहे. रस्त्याच्या बाजूला असणारे रस्ते चांगले आहेत. कारण तेथे रहिवासी भाग अधिक आहे. हा औद्योगिक परिसर असल्याने येथे मतदान नाही. त्यामुळे या रस्त्याला प्राधान्य दिले जाता नाही. महापालिकेनेही याकडे दुर्लक्ष केले आहे. 

इंडस्ट्रीयल परिसर असल्याने रस्त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साठते. त्यामुळे वाहन चालकांना खूप त्रास होतो. रस्त्यावरून चालणेही अवघड होते. महापालिकेने प्राधान्यांने रस्त्याचे डांबरीकरण करावे. 
- आर.के.कुलकर्णी, नागरिक 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Madhuri the elephant, whose rehabilitation at Vantara is being sought again by PETA India through the Supreme Court
Gokul Milk Union Election Mahayuti Seat-Sharing Formula
Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Marathi News Esakal
www.esakal.com