

onion are in bengaluru Market
sakal
उत्तूर : जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या कांदा पिकाकडे बहिरेवाडी (ता. आजरा) येथील शेतकरी वळले आणि त्यांचे अर्थकारणच बदलून गेले आहे. येथील शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा बंगळूरच्या बाजारात तेथील व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी ठेवला आहे. मोठा कांदा असल्याने विशेषतः हॉटेल व्यावसायिकांकडून मागणी वाढत आहे. यावर्षी ७० शेतकऱ्यांनी कांदा पिकवला आहे. त्यांना सरासरी एकरी १० टन उत्पादन मिळाले आहे.