
कोल्हापूर : ‘जोधपूर मिष्ठान्न’च्या मालकाचे ५० हजारांच्या खंडणीसाठी अपहरण झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. शाहूपुरी पोलिसांना अवघ्या काही मिनिटांत याची माहिती मिळाल्याने तपास गतिमान केला. पोलिसांच्या भीतीने अपहरणकर्त्यांनी प्रकाश कुकाराम चौधरी (वय ३५, रा. ताराबाई पार्क) यांना सासने मैदानावर सोडून पळ काढला. अवघ्या २४ तासांत अपहरण करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली.