"हिंदू धर्माची (Hindu Rashtra) संस्कृती परदेश आत्मसात करतील, देशात समान नागरी कायदा येणार, राज्याच्या राजकारणात गोंधळ होईल."
मुरगूड : ‘राज्याच्या राजकारणात गोंधळ होईल, कोल्हापूरचं राजकारण ढवळून निघंल,देशात नवीन कायदा येणार, मोठी महामारी येईल, उष्णतेच्या मोठ्या लाटा येतील, नदी, जलाशय आटून जातील, होईल होईल जलप्रलय होईल,’ जलाशयाला मोठं भगदाड पडंल, वादळं, भुईकंप होईलं, त्यानं जगाची उलथापालथ होईलं. अशी भाकणूक कृष्णात डोणे महाराज (Krushnat Done Maharaj) यांनी केली.