esakal | धारदार शस्राने सपासप केले तिच्यावर पतीनेच वार अन्

बोलून बातमी शोधा

null
धारदार शस्राने सपासप केले तिच्यावर पतीनेच वार अन्
sakal_logo
By
अर्चना बनगे

गांधीनगर (कोल्हापूर) : मूळ कर्नाटकातील मंजुळा कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकावर केळी विकण्याचा व्यवसाय करत होती. लॉकडाऊन झाल्यानंतर मंजुळाचा पती गावी गेला होता. मागील आठवड्यात तिचा पती परत आल्यानंतर त्यांच्यामध्ये वाद झाला होता. या वादाचे रुपांतर एवढे वाढले की,मंजुळाला आपला जीव गमवावा लागला. असे काय घडले की मंजुळाच्या पतीला हा निर्णय घ्यावा लागला. जाणून घेऊया सविस्तर..

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,

अनैतिक संबंधांच्या संशयावरून मंजुळा बसू बेळकरी (वय 40) या केळी विक्रेत्या महिलेचा धारदार शस्त्राने वार करून दगडाने ठेचून खून केला. गांधीनगर मुख्य रस्त्यावर उचगाव हद्दीत काल अकरा ते बाराच्या दरम्यान हा प्रकार झाला. Edited By- Archana Banage

दोन दिवसांपूर्वी हे दांपत्य मनाडे मळा, उचगाव येथील अर्धवट अवस्थेतील बांधकामावर एका वॉचमनच्या ओळखीने राहण्यास आले होते. दरम्यान नामदेव नरसिंगराव जवळगे (कागले मळा, गोकुळ शिरगाव) याच्याशी मंजुळाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय तिचा पती बसू याला होता. या आणि इतर कारणांनी आज सकाळी मंजुळा आणि बसूमध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसान भांडणात झाले. या भांडणात बसूने धारदार शस्राने मंजुळाच्या डोक्‍यावर, छातीवर आणि शरीरावर अन्य ठिकाणी वार करून तिचे डोके दगडावर आपटले. यामध्ये ती जागीच ठार झाली.

घटनेनंतर बसू पसार झाला. दरम्यान या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळविली. करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी आर आर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी पोलिसांसह घटनास्थळी भेट दिली. संशयिताच्या शोधासाठी श्वानपथक पाचारण केले; परंतु श्वान तिथेच घुटमळले. त्यानंतर संशयिताच्या शोधार्थ चार तपासपथके रवाना केली. याबाबतची फिर्याद बेळकरी कुटुंबीयांशी संबंधित तानाजी गोपीनाथ मोरे (इंदिरानगर झोपडपट्टी, कावळा नाका) यांनी दिली असून तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर करीत आहेत.

Edited By- Archana Banage