

Bay of Bengal Low Pressure Area Maharashtra weather update
esakal
Maharashtra rainfall forecast : महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिल्याने अनेक जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. तुरळक ठिकाणी हलक्या सरी सुरू असल्या, तरी सर्वदूर पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आज (ता. १७) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः कोरडे हवामान राहून ऊन-सावल्यांचा खेळ आणि तुरळक हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.