फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना राहा दक्ष ; विवस्त्र फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Be careful when accepting friend requests

नव्याने झालेल्या मैत्रिणीकडून हाय हॅलो पासून संदेश सुरू होतात. त्यानंतर तरूणाचे नाव, पत्ता, मित्र मंडळी अशी माहिती रात्री उशीरा पर्यंत गप्पा मारून काढून घेतली जाते

फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना राहा दक्ष ; विवस्त्र फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी 

sakal_logo
By
राजेश मोरे

कोल्हापूर - सोशल मीडियावर सुंदर मुलीची छायाचित्रे दाखवून समोरच्या तरूणावर भूरळ पाडयची. त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची. दररोज चॅटींग करून त्याला जाळ्यात ओढायचे. व्हिडीओ कॉल करून समोरच्या तरुणाला विवस्त्र व्हायला लावायचे. त्याची छायाचित्रे व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याला ब्लॅकमेल करायचा. असा नवा ऑनलाईन फसवणुकीचा ट्रेंड तरुणांच्या जीवावर बेतणारा ठरू लागला आहे. याबाबत सावध रहा असे आवाहन सायबर पोलिस ठाण्याकडून करण्यात आले आहे. 

तंत्रज्ञानाने प्रगती केली तसे प्रत्येकाकडे मोबाईल, संगणक, टॅब आले. इंटरनेट या प्रणालीचा अविभाज्य अंग आहे. सोशल मिडीयाच्या फेसबुक, इन्स्टाग्राम, टिव्टर, टिकटॉक सारख्या माध्यमातून नवनवीन मित्र होतात. हाय हॅलो पासून चर्चा होत हे या मित्रांशी भावनिक नाते निर्माण होते. नेमक्‍या याच गोष्टीचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी गळ टाकून बसले आहेत. अशा गुन्हेगारांकडून तरूणांच्या सोशल अकाउंटवर अनोळख्या मुलीचींच्या नावे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. त्या प्रोफाईलवर सुंदर मुलीचा फोटो असतो. पण या व्यक्तीला कधीही पाहीले नसतानाही तिची फ्रेंड रिक्वेस्ट तरूणाकडून स्विकारली जाते.

हे पण वाचाकोल्हापूर - ट्रकच्या केबिनमधून ३३ लाखांची चोरी

नव्याने झालेल्या मैत्रिणीकडून हाय हॅलो पासून संदेश सुरू होतात. त्यानंतर तरूणाचे नाव, पत्ता, मित्र मंडळी अशी माहिती रात्री उशीरा पर्यंत गप्पा मारून काढून घेतली जाते. यातच तरुणाला व्हिडीओ कॉल येतो. त्याला विवस्त्र व्हायला सांगितले जाते. मैत्रीचे प्रकरण पुढे पर्यंत गेले असे समजून काही तरूण यात अडकतात. त्यानंतर त्या तरूणाला मुलीच्या अकौंटमागे दडलेला गुन्हेगार पैशाची मागणी करतो. ते नाही दिले तर विवस्त्र झालेला व्हिडीओ व फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देतो. तसे अशा गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकलेले तरूण मागणी प्रमाणे पैसे देतात, स्वतःचे बरेवाईट करून घेण्याच्या निर्णयापर्यंत पोहचतात. अशा अनोखळी फ्रेंड रिक्‍वेस्ट स्विकारताना सावधानता बाळगा, अगर गैर प्रकार घडला असेल तर याबाबत सायबर पोलिस ठाण्यांशी संपर्क करा असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image
go to top