esakal | बेळगाव : दुचाकी चोरट्याच्या बेळगाव पोलीसांनी मुसक्या आवळल्या
sakal

बोलून बातमी शोधा

बेळगाव : दुचाकी चोरट्याच्या बेळगाव पोलीसांनी मुसक्या आवळल्या

बेळगाव : दुचाकी चोरट्याच्या बेळगाव पोलीसांनी मुसक्या आवळल्या

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बेळगाव: शहरासह विविध ठिकाणाहून मोटर सायकलिंची चोरी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला एपीएमसी पोलिसांनी सोमवार (ता.१३) अटक केली आहे. मोहम्मदशाहिद अब्दुलहमीद मुल्ला (वय २५ रा. आंबेडकर गल्ली पहिला क्रॉस काकती) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीच्या चोरीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आले आहेत.

हेही वाचा: साखर कामगारांना गुड न्यूज; 12 टक्के पगारवाढीस सरकारकडून मान्यता

एपीएमसी पोलीस ठाण्यासह शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटनात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिस चोरट्यांच्या मागावर आहेत. वरील अटकेतील संशयीत हा व्यवसायाने मेकॅनिक असून त्याला संशयाने ताब्यात घेण्यात आले होते. पोलीस ठाण्यात नेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने विविध ठिकाणाहून मोटर सायकलिंची चोरी केल्याची कबुली दिली.

त्यानुसार त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीच्या एकूण चार मोटारसायकली जप्त करण्यात पोलिसांना यश आले. संशयिताची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, पोलीस उपायुक्त डॉक्टर विक्रम आमटे, पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, मार्केट उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सदाशिव कट्टीमणी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

loading image
go to top