esakal | साखर कामगारांना गुड न्यूज; 12 टक्के पगारवाढीस सरकारकडून मान्यता
sakal

बोलून बातमी शोधा

sugar worker

साखर कामगारांना गुड न्यूज; 12 टक्के पगारवाढीस सरकारकडून मान्यता

sakal_logo
By
- हेमंत पवार

कऱ्हाड : महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या पगारवाढीचा प्रश्न तीन वर्षे रेंगाळला होता. त्यासंदर्भात सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विशेष लक्ष घालून साखर कामगार प्रतिनिधी मंडळ, साखर संघ व शासन या त्रिपक्षीय समितीस जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यासोबत बैठक घ्यायला लावली. त्यामध्ये समन्वयाने 12 टक्के पगारवाढीचा प्रस्तावाची शिफारस करण्यात आली. त्यास त्रिपक्षीय समितीने मान्यता दिली. त्याबद्ल महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळामार्फत जेष्ठ नेते पवार यांचे आभार मानुन सहकारमंत्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

राज्यातील साखर कामगारांच्या प्रश्नाकडे गेली तीन वर्षे कोणी पाहिलेच नाही. त्यामुळे त्यांच्या पगारवाढीचा प्रश्न रेंगाळलेला होता. त्या प्रश्नासंदर्भात सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विशेष लक्ष घालून, साखर कामगार प्रतिनिधी मंडळ, साखर संघ व शासन या त्रिपक्षीय समीतीचे साखर कारखान्याचे प्रनेते खासदार पवार यांच्यासोबत बैठक घेण्यास भाग पाडले.

हेही वाचा: टेंभूच्या अधिकाऱ्यांना 15 दिवसांचा अल्टीमेटम

त्यामध्ये समन्वयाने 12 टक्के पगारवाढीचा प्रस्तावाची शिफारस करण्यात आली. त्यास त्रिपक्षीय समितीने मान्यता दिली. त्याबद्दल जेष्ठ नेते खासदार पवार यांचे आभार मानुन सहकारमंत्री पाटील यांचा महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे उपाध्यक्ष व सह्याद्रि साखर कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष डी. बी.मोहिते, सह्याद्रि साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, खजिनदार आर.जी.तांबे, सह खजिनदार ए.एस.साळुंखे, संघटनेचे पदाधिकारी रामभाऊ जगताप, राजेंद्र मोहिते यांनी सत्कार केला. सरकारच्या या निर्णयामुळे साखर कामगारांत आनंदाचे वातावरण आहे.

loading image
go to top