
Uttarakhand Travel Update : दरवर्षी श्रावण महिन्यात धार्मिक पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उत्तराखंडला चारधाम यात्रेसाठी जातात. बेळगाव व चंदगड तालुक्यातूनही जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गंगोत्री, यमुना, बद्रीनाथ, केदारनाथ या चारधामचे दर्शन घेतात. बेळगाव तसेच शिनोळी (ता. चंदगड) येथील सोळा तरुण या वर्षी यात्रेला गेले आहेत.