Kolhapur : मेलबर्नमधल्या 'उंच माझा झोका' पुरस्कारामध्ये जयसिंगपूरच्या भक्तीचा सन्मान

भक्तीला 'आदर्श उद्योजिका' म्हणून गौरवण्यात आले
Kolhapur
Kolhapursakal
Updated on
Summary

भक्तीला 'आदर्श उद्योजिका' म्हणून गौरवण्यात आले

कोल्हापूर : 'नॉर्दन मेलबोर्न मराठी मंडळ' कडून आयोजित केलेल्या 'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळा पार पडला. विविध क्षेत्रांमध्ये गौरवास्पद कार्य करणाऱ्या मराठी महिलांना या प्रसंगी गौरवण्यात आले. यावेळेस कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरची भक्ती मनिष मांगले ,जी सध्या ऑस्ट्रेलिया (मेलबोर्न) मध्ये राहते, हिला हा पुरस्कार देण्यात आला.

त्या स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर असून त्या ' ऑस्ट्रेलियन सुपर ' या कंपनीमध्ये काम करतात. नोकरी सांभाळत, छंद म्हणून वेगळी वाट घेत आपले छोटेसे स्टार्ट अप सुरू करणाऱ्या भक्तीला 'आदर्श उद्योजिका' म्हणून गौरवण्यात आले. भक्तीचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर या लहान शहरात झाली. त्यांनी राजर्षि शाहू महाराजांच्या उदात्त दृष्टीकोन डोळ्यासोमर ठेवला आहे.

तंबाखूची मोठ्ठी व्यापारपेठअशी  प्रसिद्ध असलेल्या या शहरातील,श्री अण्णासाहेब भूपाल निटवे हे सुप्रसिद्ध व्यापारी होते. त्यांच्याकडे बालवयातच आजोबांकडून समृद्ध वारसा असा आहे. त्यांना मोठेपणा काहीतरी करण्याची प्रबळ इच्छा होतीच. त्यांना त्यांच्या मातृभूमीसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यांनी आपल्या देशातील दारिद्र्य कमी करण्यासाठी 'उद्योजिका' बनण्याचे स्वप्न पाहिले. कोल्हापूर जिल्ह्यातील खेड्यांमधील महिलांना रोजगार मिळवण्यासाठी त्यांनी हि खटपट केली.

तरुण महिला, तसेच साठ सत्तर वर्षांपर्येंत महिलांना भक्तीने काम मिळवून दिले आहे. मी बनवलेल्या वस्तू या परदेशात जाणार या आनंदात महिलांनी रात्रंदिवस काम करून वस्तू बनवायला सुरवात केली.

गणेश चतुर्थीला गणपतीला लागणारे कापसाचे वस्त्र, फुलवाती अश्या वस्तू त्या सुबक बनवतात. हॅण्डमेड वस्तू लोकांना खूप आवडतात. आजकाल खण साड्या खूप वापरतात. या साड्यांपासून शिवलेले कपडे, त्यांच्या मापानुसार शिवून मिळतात. हे सर्व काम आज ग्रामीण महिला करतात. रक्षाबंधनाच्या वेळेस विविध राख्या, दिवाळीसाठी सजावटीचे साहित्य इ. वस्तू या महिला बनवतात.सुप्रसिद्ध पत्रकार 'हर्षदा स्वकूळ' यांच्य हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

"भारतातील ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना उत्तेजन देऊन, त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करून देणाऱ्या भक्तीचे हर्षदा यांनी भरभरून कौतुक केले.  आपल्या देशातील दारिद्रय हटवण्यासाठी व गरिबांना रोजगार मिळवून देण्यासाठी भक्तीने चोखाळलेली वाट सर्वांनाच प्रेरणादायी आहे " असेही त्या म्हणाल्या. यावेळी गौरवचिन्ह देऊन सर्व पुरस्कारार्थींना गौरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Ajra schoolgirl death news
Ramtirth Waterfall Ajara after heavy rainfall
Gokul Election Resolution Controversy kolhapur vinya kore, hasan mushrif, satej patil, prakash abitkar, dhnanjay mahadik, mahadevrao mahadik
Kolhapur child accident latest news
Marathi News Esakal
www.esakal.com