गडहिंग्लज : खणदाळ (ता. गडहिंग्लज) येथे जाहिद इस्माईल मकानदार या युवकाने धार्मिक तेढ वाढविणारे स्टेटस ठेवल्याच्या घटनेचे पडसाद रात्री उशिरापर्यंत उमटले. यामुळे गावात कडक बंदोबस्तामुळे पोलिस छावणीचे स्वरूप आले असून, रात्री मकानदार यांच्या शेजारील घरावर दगडफेक केल्याप्रकरणी १२ तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस (Gadhinglaj Police) अधिकाऱ्यांनी गावात बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले आहे.